महाराष्ट्र राज्य ही संताची भुमी या भुमीवर खुप संत होवुन गेले,हजारो-लाखो वारकरी संप्रदाय भक्त पायी दिंडीला जात असतात भिवंडी ग्रामीण व वाडा अंबाडी कुडूस भागातीलही वारकरी पायी दिंडी काढुन खंडेश्वरी नाका मार्गे वाडा शहरातून त्र्येबकेश्वर येथे जात असतात म्हणून वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथून जाणारया वारकरी संप्रदायांना आज जन ग्रामीण सेवा संस्थेच्या वतीने संध्याकाळी खंडेश्वरी नाका येथे वारकरी संप्रदाय भक्तांचे स्वागत करुन अल्प आहार व चहापानाची सोय केली त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष अनंता वनगा,सदस्य अध्यक्ष जगदीश केणे,संजयजी भानुशाली,दयानंद हरल,लोकेश खत्री,शिक्षक राजेद्र टबाले,अजय कोंब वारकरी संप्रदायांच्या सेवेशी उपस्थित होते!
आज दि. ३१ मार्च २०२३ रोजी वाडा तालुक्यातील लोहपे येथे राम नवमीच्या निमित्ताने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा यांच्या सौजन्याने द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय अंबाडी व आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना लोहपे ,केळठण , निंबवली गाव कमिटी आयोजित आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना लोहपे - केळठण - निंबवली गाव कमिटीचे आदेश पाटील , नितिन पवार , सुभाष जाधव , संदिप पाटील , विनोद फऱ्हाड , निवृत्ती फऱ्हाड, सुभाष गायकर , अस्मिता पाटील , तसेच राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय अंबाडीचे डॉ. गीतांजली पवार , डॉ. किर्ती पाटील , रितेश शेलार , प्रिया पाटील , सानिका भोईर , सतिष बुकले , रेश्मा पवार , कविता रांदडा , मयुरी गावित , अश्विनी बेनके , अपर्णा पागी इत्यादी उपस्थित होते. या शिबिरात किडणीवरील आजारावर तपासणी , त्वचेच्या आजारावर तपासणी , मोफत ECG ( हृदयाची तपासणी ) , गरोदर मातांची तपासणी , लिव्हर वरील आजारावर तपासणी , मोफत Blood Suger ( रक्त शर्करा तपासणी ) , नवजात बालकांची व लहान मुलांची तपासणी , अंगदुखी , सांधेदुखी , मोफत आरोग्य तपासणी , ब्लडप्रेशर , डायबिटीस, थॉयरंईड , व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबिरास आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष तसेच जन ग्रामिण सेवा संस्था वाडा उपाध्यक्ष श्री. अरुण खुलात , आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा कमिटी संघटक तसेच जन ग्रामिण सेवा संस्था वाडा खजिनदार श्री. नितिन दळवी व सदस्य मनोज गडग यांनी भेट दिली. या आरोग्य शिबिरात १०५ रुग्णांनी लाभ घेतला, शिबिर यशस्वी करण्यासाठी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे लोहपे केळठण निंबवली गाव कमिटीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. कमिटीच्या वतीने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा , द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय अंबाडी यांचे आभार मानण्यात आले.
डहाणू तालुक्यातील धानिवरी गावात आदिवासी समाजाच्या कुटूबीयांना त्यांच्या स्वतच्या राहत्या घरातून प्रशासनाने महिलांना जबरदस्तीने अंगावरील कपडे निघेपर्यत फरफटत बाहेर काढले व घरे पोक्लेनने तोडली,एक महिना झाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने जिल्ह्यातील संघटना एकत्र येवून त्यांच्या प्रतिनिधींनी मा मुख्यमंत्री महोद्यांची भेट घेवुन सविस्तर सांगितले!
दि २५/७/२०२१ रोजी मोखाडा तालुक्यातील मा.आमदार किसन कथोरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शेंड्यांचीमेट या संस्थेच्या शाळेला जन ग्रामिण सेवा संस्था वाडा चे अध्यक्ष अनंता वनगा यांनी भेट दिली होती त्या शाळेच्या मुख्याधापक सोनु भोये सरांशी चर्चा केली असता शाळेसाठी शैक्षणिक साहित्याची गरज आहे असे भोये सरांनी अनंता वनगा यांना सांगितले , सदर शाळेला मदत मिळावी असे अनंता वनगा यांनी सोशल मिडियावर आवाहन केले होते, ही पोस्ट वाचुन पालघर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी आमची वसई सामाजिक संस्थेने या शाळेतील १५० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरवले व आज शनिवार दि. ३१/७/२०२१ रोजी मोखाडा तालुकयातील अतिदुर्गम शाळेतील ६ वी ते १० वी च्या 150 विदयार्थीना १) 200 पानी लांब वह्या 1800 नग २) पेन 300 नग ३) फुलस्केप पेपर 2 बंडल ४) प्लेन फुलस्केप 2 बंडल ५) झाडू 5 नग ६) खराटे 5 नग ७) ब्लॅक बोर्ड 5 नग ८) 150 स्कुल बॅग ९) 5 डस्टर १०) खडू 5 बॉक्स असे साहित्य वाटण्यात आले आणि ९ वी १० वी च्या मुलींना sanitry pad ही दिले. तसेच गावातील महिला, पुरुष , लहान मुले , मुली यांना कपडे सुद्धा देण्यात आले. या कार्यक्रमास आमची वसई सामाजिक संस्थेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे, दुर्गमित्र पुरुषोत्तम देवधर, साई पाटील, हिम्मत घुमरे, ईश्वरी घुमरे, केशव भावसार, रोशनी वाघ, मधुबाला सिंग, सुरेखा सावंत, महेश पेंडसे, पुष्कर करंदीकर, शर्वरी बापट, अनिल भालेराव, पल्लवी पवार, रुचिता रेडकर, सचिन पाटील, गौरी जांभेकर, दीप देवधर, मल्हार वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जन ग्रामिण सेवा संस्था वाडा चे अध्यक्ष अनंता वनगा,उपाध्यक्ष व नगरसेवक अरुण खुलात व वकील किरण भोईर साहेब तसेच शाळेचे संचालक मंडळही उपस्थित होते. यावेळी शेंड्याचीमेट ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य राम भोये यांनी आमची वसई सामाजिक संस्थेच्या व जन ग्रामिण सेवा संस्था वाडा च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यापुढेही आमच्या विद्यार्थांना काही अडचण आल्यास अनंता वनगा साहेबांना आम्ही कळवु असे शाळेचे मुख्याधापक सोनु भोये व ग्रामपंचायत सदस्य राम भोये यांनी सांगितले.
वाडा गांधरे गावातील सिताराम ठाकरे यांचे निधन ५ वर्षापुर्वी झाले होते,त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तिन मुले आहेत. गरीब परिस्थिती असल्याने मोलमजुरी करुन मुलांचे शिक्षण व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह श्रीमती - सरिता सिताराम ठाकरे ( वय - ४५) या करतात. मुलांना शिक्षणाची आवड आहे पण शैक्षणिक साहित्य घेण्यास त्यांना मदतीची गरज आहे असे समजताच जन ग्रामिण सेवा संस्थेचे अध्यक्ष अनंता वनगा व उपाध्यक्ष अरुण खुलात यांनी कु. वैष्णवी सिताराम ठाकरे इयत्ता - ८ वी, कु. वैशाली सिताराम ठाकरे इयत्ता - ६ वी , कु. भावेश सिताराम ठाकरे इयत्ता - ४थी , या तीन विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप केले हे विद्यार्थी कुणबी समाजातील असुन गरीब कुटुंबातील आहेत या विद्यार्थांची आई मोलमजुरी करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. वैष्णवी ठाकरे इयत्ता- ८वी या विद्यार्थिनीला गांधरे गावातीलच उच्चशिक्षित प्रणव भोईर या तरुणाने त्यांच्या मित्रांच्या मदतीने शैक्षणिक साहित्य दिले. तसेच यापुढेही काही शैक्षणिक मदत लागली तर जन ग्रामिण सेवा संस्था मदत करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी सांगितले.
आज दि १-८-२०२३ रोजी ऐंनशेत ग्रामपंचायत मधील पेठरांजणी जि प शाळा येथील गरिब कुटूबींयातील १ ली ते ५ वी च्या विद्यार्थांना जन ग्रामीण सेवा संस्थेच्या वतीने मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आले, सदर जन ग्रामीण सेवा संस्था ही आरोग्य व शैक्षणिक क्षॆत्रांत ग्रामीण भागात काम करत असते,तसेच संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थांना दरवर्षी मदत केली जाते,आज पेठरांजणी येथील जि प शाळेत वह्या वाटप करत असताना ऐनशेत ग्रामपंचायत सदस्य दयानंद हरल,संस्थेचे उपाध्यक्ष अरुण खुलात,खजिनदार नितीन दळवी,जगदीश केणे,रविद्र मोरे,संदेश वाघ,जगन मोरे व शिक्षिका निकिता ठाकरे उपस्थित होते!
सदर आरोग्य शिबिरात विविध आजारांवर तपासणी करण्यात आली,लहान मोठ्या सर्वानी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थिती लावुन तपासणी केली,या शिबिरात जवळ -जवळ 200 जणांनी आपली तपासणी करुन घेतली , ....... या शिबिरात जन ग्रामिण सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. अनंता वनगा , वाडा नगरपंचायत नगरसेवक तथा जन ग्रामिण सेवा संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण खुलात,संस्थेचे सदस्य जगदिश केणे,ऐनशेत ग्रामपंचायत सदस्य दयानंद हरळ,आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा शहर कमिटी अध्यक्ष सुनिल तुंबडा,सदस्य अर्जुन गडग,आयडीयल जनरल हॉस्पिटलचे डॉ,श्रेयश गडग,डॉ. वैभवी , जितेंद्र तरे,देवीदास कांबेरे व इतर स्टाफ हे उपस्थित होते,जिल्हा परिषद शाळा कवटेपाडा येथील मुख्याधापक मा. राजेश पाटील सर,सहशिक्षक महेंद्र शनवारे सर हे सुद्धा उपस्थित होते . तसेच ओमकार मित्र मंडळ वाडा कवटेपाडा चे सदस्य गुरुनाथ भोईर , विशाल उंबरसाडा , विनोद घाटाळ , सुधिर उंबरसाडा,सुनिल कवटे , शिवराम म्हसकर हे उपस्थित होते ... या शिबिराचे आयोजन आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा शहर कमिटी व ओमकार मित्र मंडळ वाडा कवटेपाडा यांनी केले होते.
मी एक रक्तदाताही आहे!